राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा. डॉ. योगिता मारुती रांधवणे-गायकवाड द्वितीय तर पुणे येथील वर्षा बालगोपाल यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
भूमी फाउंडेशनने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य साहित्य संमेलन ही घेतले. संमेलनाचे उद्घाटन कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ. आण्णासाहेब खेमनर यांच्या हस्ते झाले होते. अध्यक्षस्थानी प्रा. तुकाराम पाटील होते. प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई, प्रकाश कुलथे, ॲड. सदानंद पाठक, डॉ. बाळासाहेब मुरादे यांनी महाराष्ट्र व कामगार दिन यावर परिसंवादात मनोगत व्यक्त केले. राहाता येथील प्रा. डॉ. शिवाजी काळे यांनी आमच्या गावातील कोरोना ही कथा सादर केली. विजेत्या स्पर्धकांचा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. कैलास पवार, प्रा. बाबूराव उपाध्ये, प्राचार्य टी. ई. शेळके, डॉ. अविनाश देसाई, प्रा. तुकाराम पाटील, डॉ. शिवाजी काळे यांनी गौरव केला. भीमराज बागुल यांनी सूत्रसंचालन केले तर बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.
----------