सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखान्यांनी भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराला (कोविड सेंटर) मदत केली आहे.
कोविड केअर सेंटरमधील फ्रंटलाईनला काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क देण्यात आले. वाघुंडे खुर्द येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोविड सेंटरमधील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मास्कची गरज असल्याचे नोडल ऑफिसर डॉ. मानसी मानूरकर यांनी सांगितले. त्यानुसार सुपा एमआयडीसीतील जाफा या पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनाने त्यास मंजुरी देऊन कार्यवाही केली. जाफाचे व्यवस्थापक नेमिनाथ सुतार, ज्ञानेश देशपांडे, राजेंद्र बांगर यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, आमदार नीलेश लंके व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे मास्क सुपुर्द करण्यात आले. वाघुंडे येथील गरजू कुटुंबांना फूड पॅकेट तयार करून तेल, मसाला, साबण, पीठ आदी आवश्यक किराणा माल देण्यात आला. यावेळी जाफाचे जनरल मॅनेजर आप्पासाहेब काटे, व्यवस्थापक नेमिनाथ सुतार, अमोल काळे, सरपंच रेश्मा पवार, उपसरपंच मंगल मगर, ग्रामसेविका रेणुका भोर, शिक्षक संतोष मगर, उद्योजक राजेंद्र मगर आदी उपस्थित होते.
---
२९ कानिफ भाळवणी