यातील तक्रारदाराने एका पतसंस्थेकडून २०१४ मध्ये सोने तारण ठेवून ३० लाख रुपये कर्ज घेतले होते. संबंधित प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराने न्यायालयाच्या आदेशानुसार पतसंस्थेच्या कर्जाची सर्व रक्कम भरली असतानाही पतसंस्थेने तक्रारदाराविरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर यांच्याकडे कलम १०१ नुसार वसुलीची कारवाई करण्याचे आदेश मिळण्याकरिता प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला होता. तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिला म्हणून त्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे गुरुवारी एक लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. कायनेटिक चौकातील एका हॉटेलमध्ये ही लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे व अन्य पथकाने ही कारवाई केली.
सहायक निबंधक लाचेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:21 AM