अहमदनगर : महाराष्ट्रातील अहमदनगरसह १३ जिल्ह्यात जलस्तर अत्यंत कमी होता. अशा जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून व्हॅर्च्युअल प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरू आहे. गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी मिळणार आहे. हे काम महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात १९ लाख परिवाराला शुद्ध पाण्याची सुविधा मिळाली आहे. यामध्ये १३ लाख परिवाराला कोरोनाच्या काळातही पाणी पोहोचवले आहे, असे मोदी म्हणाले.
घर घर शौचालय, तसेच ‘नळ से जल’ पोहोचवून नागरिकांचा वेळही वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मायक्रो फायनान्सद्वारे सेल्फ हेल्प या स्वरुपात महिलांना कर्ज वाटप केले आहे. किसान क्रेडीट कार्डाचीही शेतकरी परिवाराला सुविधा दिली आहे.
इथेनॉलचा प्रकल्पाचे महाराष्ट्रात शंभराहुन अधिक उद्योग सुरू आहेत. तेलाचा पैसा जो बाहेर जात होता तो आता शेतकºयांच्या खिशात येईल. यामुळे साखर कारखान्यांना प्रोत्साहन दिले. पाण्याच्या प्रश्नावर स्व. विखे यांनी जनआंदोलन केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची ओळखच पाण्याच्या कामासाठी आहे.
घराघरात त्यांनी पाणी पोहोचवले. २६ योजनांद्वारा पाणी पोहचविले आहेत. यातील ९ योजना पूर्ण झाल्या आहेत. पाच लाख हेक्टर जमिनीला सिंचन मिळाले आहे. जुलै २०१८ मध्ये ९० सिंचन प्रकल्पांचे काम सुरू झाले होते. दोन-तीन वर्षात हे काम पूर्ण होईल.