दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, गुलाबचंद झांजरी, मयूर पाटणी, वीरसेवादलचे अध्यक्ष प्रतीम पांडे, सुभाष चुडीवाल, राजेंद्र पाटणी, अजय चुडीवाल, जितेंद्र अग्रवाल, सुरेश झांजरी, सुनील कासलीवाल, सुहास चुडीवाल, जितेंद्र कासलीवाल, प्रशांत पाटणी, रत्नाकर कोरडे, जतिन सोलंकी, अर्चना पानसरे, जयश्री जगताप आदी उपस्थित होते.
अथर्व कोरडे यांने श्रीरामपूरचे नाव देश पातळीवर रोशन केले आहे. त्याने असेच खेळत राहावे व भविष्यात ऑलिम्पिकमध्ये त्यास खेळण्याची संधी मिळावी हीच श्रीरामपूरकरांची इच्छा असल्याचे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले. अथर्व कोरडे याला योग शिक्षक जतिन सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी अथर्व याने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करून भारतात दुसरा क्रमांक पटकावला होता.