आश्वी : संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. दाढ खुर्द येथे मगंळवारी (दि.३ मार्च) सकाळी ऊस तोडणीचे काम सुरू असताना बिबट्याने ऊस तोडणी मजूर दीपक विठ्ठल काबंळे (रा.सिल्लोड, चाळीसगाव) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कांबळे हे जबर जखमी झाले आहेत. जखमीला लोणी व नंतर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.दाढ खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या खळी रस्त्यावरील साहेबराव रामजी जोशी यांच्या गट नंबर १२७ मध्ये मगंळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ऊस तोडणी सुरु होती. यावेळी उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने ऊस तोडणी मजूर दीपक काबंळे यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या हाताला तसेच पाठीला गंभीर दुखापत झाली. यावेळी ऊस तोडणी मंजुरानी आरडाओरडा केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते सुनील जोशी यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी मजुराला ग्रामस्थाच्या मदतीने लोणी येथील रुग्णालयात पाठवले. दरम्यान काबंळे यांना तेथून अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा ऊस तोडणी मजुरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 2:27 PM