प्रभाग सातमधील मंजित दुद्देल सुनार यांचे हे घर आहे. सुनार यांच्या घरी लोकबहादूर प्रजित सुनार, कुणंती लोकबहादूर सुनार (रा. जयराम काॅलनी, पाचोरा, जि. जळगाव) हे नातेवाईक आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर मंजित हा कामासाठी घराबाहेर पडला आणि इतर घरी झोपलेले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा लाथा मारून हत्याराने तोडून आत प्रवेश केला.
आवाज आल्यानंतर लोकबहादूर जागा झाला. परंतु चोरट्यांनी त्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच कुणती यांच्या डोक्यात राॅड मारून हातावर चाकूने वार केले. त्यात त्या जखमी झाल्या. चोरट्यांनी लोकबहादूर यांच्या पाकिटातील ११ हजार रुपये आणि पत्नीच्या गळ्यातील नऊ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण घेऊन धूम ठोकली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जखमी कुणती यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलीस अधीक्षक समाधान सुरवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
---------