पाथर्डी : शहरातील सार्वजनिक तसेच खाजगी जागेवरील अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी पाथर्डी शहरवासियांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलीस, मह्सूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. शहरात तहसील कार्यालयासमोर, वसंतदादा विद्यालय ते जुन्या बस स्थानक तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत तसेच आंबेडकर चौकापासून शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कच्ची तसेच सिमेंटची पक्की अतिक्रमणे करून टपऱ्या तसेच इमारती उभारण्यात आल्या. परंतु अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी असलेले महसूल,नगरपालिका,सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत असल्याने याच्या निषेधार्थ व आठवडा भरापासून नव्याने झालेल्या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या रस्त्यालगतच्या नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय पदाधीकार्यानी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी याच्यसह नगरपालिका मुख्याधिकारी,सार्वजनिक बांधकाम,महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. यावेळी येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी पेट्रोल टाकून तहसील कार्यालयाचा दरवाजा पेटविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे व हवालदार संजय आव्हाड तसेच इतर कर्मचाऱ्यांनी बडे यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. मोर्चाची माहिती मिळताच शेवगाव परिक्षेत्राचे पोलीस उपाधीक्षक संदीप जवळे यांनी घटना ठिकाणी धाव घेत मोर्चाकर्याना शांततेचे आवाहन करत सर्व विभागाच्या बैठक घेवून अतिक्रमण हटवन्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरयानी दुपारी चार वाजेपर्यंत तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिक्रमण हटाव मोर्चादरम्यान पाथर्डी तहसील जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 1:22 PM
पाथर्डी शहरवासियांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलीस, मह्सूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्दे तहसील कार्यालयासमोर, वसंतदादा विद्यालय ते जुन्या बस स्थानक तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत तसेच आंबेडकर चौकापासून शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कच्ची तसेच सिमेंटची पक्की अतिक्रमणे करून टपऱ्या तसेच इमारती उभारण्यात आल्या.आठवडा भरापासून नव्याने झालेल्या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या रस्त्यालगतच्या नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय पदाधीकार्यानी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी याच्यसह नगरपालिका मुख्याधिकारी,सार्वजनिक बांधकाम,महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. यावेळी येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी पेट्रोल टाकून तहसील कार्यालयाचा दरवाजा पेटविण्या