राजूर : चालू आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या कल्याणकारी योजना पुर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करून ती कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करावीत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.शुक्रवारी अकोले तालुक्यातील राजूर येथील अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात आयोजीत नवसंजीवन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पंडीत लोणारे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय कृ षी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे,प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, मंडल कृषी अधिकारी लक्ष्मण नवले, तहसिलदार मुकेश कांबळे यांसह विविध शाासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, विविध विकास कामांसाठी मिळालेल्या निधीचा पुर्णपणे विनियोग होत नसल्याने पुढील वर्षी मागणी करता येत नाही. त्यामुळे सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत आणि मान्यता मिळालेली सर्व कामे डिसेंबर अखेर पुर्ण करावी. नवसंजीवनी योजनेअंर्तगत असलेल्या गावांचा कामातील आढावा त्यांनी घेतला.