बुधवारी (३१ मार्च) झालेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे यंदा ऑनलाइन पद्धतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे संचालक सतीश गोडगे, सोमनाथ सोनवणे, मारुती कवडे, गंगाधर जायभाय, दादासाहेब देशमुख, सुधीर वाघमारे, उबेद शेख, अरुण वाघ, दिनकर चत्तर, अवधूत आहेर, आनंद गाडेकर, रमेश आहेर, कुसुम रहाणे, सुशीला आगळे, भारत मुंगसे, महेंद्र गुंजाळ, शिवाजी थोरात, गजेंद्र अभंग, सचिव सतीश गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
सभापती खेमनर म्हणाले, वडगावपान येथील उपबाजार समितीमध्ये जमीन सपाटीकरण करत संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. दर शनिवारी येथे जनावरांचा बाजार भरतो. याला शेतकरी, व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मुख्य बाजार समितीत कांदा लिलाव आठवड्यातून पाच दिवस सलग सोमवार ते शुक्रवार होत असून हा निर्णय योग्य ठरला. असेही खेमनर म्हणाले. सभेचे अहवाल वाचन सचिव गुंजाळ यांनी केले. आभार संचालक वाघमारे यांनी मानले.