राळेगणसिद्धी : महावितरणची वीज वापरणाऱ्या राज्यातील ४५ लाख शेतीपंपांच्या वीज वापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र आॅडिट करणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी राळेगणसिद्धीत सांगितले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकºयांचा वीजवापर व वीजबिलासंदर्भात प्रश्न उपस्थित करून आंदोलनाचा इशारा देणारे पत्र बावनकुळे यांना पाठविले होते. त्याची तातडीने दखल घेऊन मंत्री बावनकुळे यांनी सोमवारी राळेगणसिद्धी गाठली. त्यांनी या प्रश्नाबाबत अण्णांशी चर्चा करीत सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, शेतीपंपांच्या वीजवापराचे काटेकोर नियोजन होण्यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेकडून राज्यातील सर्वच कृषिपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांत जिल्हानिहाय आॅडिट केले जाईल. त्यानंतरच्या तीन महिन्यांत हे बिल वसूल केले जाईल. कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला. शेतीपंपांची थकबाकी २९ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. शेतकºयांकडे व्याज, दंड वगळता १८ हजार कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. आॅडिटनंतर वीजबिलाबाबतच्या तक्रारी उरणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जमीन देणाºया गावातील शेतकºयांना दिवसा अखंडित वीज देण्याचे धोरण आखल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांसाठी वरदान ठरू शकणाºया या योजनेला अधिक गती देण्यात येत आहे. राळेगणसिद्धीत या योजनेतून साकारणाºया दोन मेगावॅट वीज प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली. या प्रकल्पात आणखी तीन मेगावॅटची क्षमता वाढविण्यास मंजुरी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सरपंच प्रभावती पठारे, माजी सरपंच रोहिणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी, संजय पठाडे, उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे, दादा गाजरे, राजाराम गाजरे, माधव पठारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.दोषी अधिका-यांवर कारवाईअण्णा हजारे अध्यक्ष असलेल्या राळेगणसिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्थेला अधिकचे वीजबिल पाठविल्याप्रकरणी दोषी अधिकाºयांवर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तातडीने कारवाई केली. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांची जळगावला, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांची गडचिरोली येथे, पारनेरचे उपअभियंता मंगेश प्रजापती यांची नागपूर, तर कार्यकारी अभियंता सुधाकर जाधव यांची मराठवाड्यात बदली केली.
४५ लाख शेतीपंपांच्या वीजवापराचे ३ महिन्यांत आॅडिट : बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 9:18 PM