शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अस्तित्वात नसलेल्या संस्थेचे आॅडिट

By admin | Published: October 27, 2016 12:26 AM

मिलिंदकुमार साळवे , अहमदनगर सहकार आयुक्तांनी खात्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार खणून काढून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या

मिलिंदकुमार साळवे , अहमदनगरसहकार आयुक्तांनी खात्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार खणून काढून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या सहकार विभागातच भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण झाल्याचे वारंवार समोर येत आहे. मंगळवारी टाकळी ढोकेश्वर येथे ज्या वसंतदादा पतसंस्थेच्या चौकशी अहवालासाठी अडीच लाखांची लाच मागणाऱ्या विशेष लेखापरीक्षकास लाच घेताना पकडल्यानंतर ही बाब अधिकच अधोरेखित झाली. याच पतसंस्थेचे विलीनीकरण झाल्यानंतर ही संस्था अस्तित्वात नसतानाही तिचे लेखापरीक्षण करण्याचा अजब कारभार सहकार विभागाने केल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून सहकार खात्याने या संस्थेसह इतरही अनेक संस्थांच्या चौकशा रखडून ठेवल्या आहेत.टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाकडी (ता. राहाता) येथील वर्धमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ३ जानेवारी २०१३ च्या आदेशाने विसर्जन झाले. त्यापूर्वीच वर्धमानच्या व्यवस्थापनाने या पतसंस्थेचे लेखापरीक्षण व आर्थिक परिस्थिती विचारात घेतल्यानंतरच ‘वसंतदादा’आपल्या संस्थेत विसर्जित केली. निबंधक कार्यालयाने विर्सजनासाठी ३० नोव्हेंबर २०१२ ची स्थिती विचाराधीन घेतली होती. वर्धमान पतसंस्थेने एल. व्ही. थोरात यांची वैधानिक लेखापरीक्षक म्हणून नेमणूक केल्यानंतर वसंतदादा पतसंस्थेचे १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या मुदतीचे लेखापरीक्षण केले. ‘वसंतदादा’ ३० नोव्हेंबर २०१२ रोजी विसर्जित झालेली असताना तिचे ३१ मार्च २०१३ अखेरचे लेखापरीक्षण केल्याने संस्था अस्तित्वात नसताना तिचे लेखापरीक्षण केल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ (३) (ब) अन्वये सहकारी संस्था (फिरते पथक) पी. आर. आरणे यांनी २४ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हा उपनिबंधकांना तपासणी अहवाल दिला. त्यातही संस्था अस्तित्वात नसताना लेखापरीक्षण झाल्याचे अधोरेखित झाले. याबाबत ‘वसंतदादा’चे माजी पदाधिकारी राजेंद्र गागरे यांनी प्रमाणित लेखापरीक्षक लहानू वामन थोरात यांनी विलीनीकरणाद्वारे विसर्जित झालेल्या व अस्तित्वात नसलेल्या संस्थेचे बेकायदेशीरपणे व खोडसाळपणे, पूर्वग्रहदूषित बुद्धीने लेखापरीक्षण करून अधिकाराचा गैरफायदा व दुरुपयोग केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे केली. सहनिबंधक राजेश जाधवर यांनी २१ जून २०१६ ला जिल्हा उपनिबंधकांना याबाबत आदेश देऊनही गेल्या चार महिन्यांमध्ये गागरे यांच्या तक्रारीवर निर्णय झालेला नाही. संबंधित प्रमाणित लेखापरीक्षक लहानू वामन थोरात यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे.