कोपरगाव : कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने गौतम पब्लिक स्कूलवर विजय मिळवून विजेतेपद पटकावले. गौतम स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.कोळपेवाडी येथे राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत राज्यभरातून संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील अंतिम सामना कोपरगावच्या गौतम पब्लिक स्कूल व औरंगाबाद संघांमध्ये झाला. यात अत्यंत चुरशीच्या सामन्यात औरंगाबादच्या संघाने गौतम स्कूलच्या संघावर २-१ गोलच्या फरकाने विजय मिळविला. रत्नागिरीच्या संघास तृतीय क्रमांक मिळाला. अभिषेक काळे, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुर्यभान कोळपे, संचालक दिलीप चांदगुडे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. तसेच सुशिलामाई काळे यांच्या स्मणार्थ आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांच्या हस्ते झाले. पंच म्हणून कपिल वाघ, धीरज चव्हाण, लियाकत अली, जुबेर खान व धुमाळ यांनी काम पहिले. स्पर्धेसाठी प्राचार्य नूर शेख, क्रीडा संचालक सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, संजय इटकर, रिजवान पठाण, कन्हैया गंगुले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सत्तार शेख व गोरख चव्हाण यांनी केले.
कोळपेवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत औरंगाबाद अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 4:50 PM