शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

नोकरी सोडून गोमाता सांभाळणारा अवलिया;  आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ हातगावात सुरू केली गोशाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 2:59 PM

शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील एका युवकाने महाराष्ट्र सुरक्षा दलातील सुरक्षारक्षक ही शासकीय नोकरी सोडून आईच्या स्मरणार्थ गावातच गोशाळा सुरू केली.

संजय सुपेकर  । बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील एका युवकाने महाराष्ट्र सुरक्षा दलातील सुरक्षारक्षक ही शासकीय नोकरी सोडून आईच्या स्मरणार्थ गावातच गोशाळा सुरू केली. या गोपालक अवलियासह संपूर्ण कुटुंबालाच गायींचा लळा लागला आहे.हातगाव येथे गोपालक निलेश बाबासाहेब ढाकणे या युवकाने ‘वात्सल्य’ नावाने मे २०१९ मध्ये गोशाळा सुरू केली आहे. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असलेल्या निलेशने आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ गायींची सेवा करण्याचा विडा उचलला. या गोशाळेतील गायींना चारा टाकणे, सोडबांध करणे, पाणी पाजणे, शेण उचलणे, निगा राखणे, खाद्य तयार करून खाऊ घालणे आदी कामे कुटुंबातील सर्वजण आवडीने करतात. निलेशसह त्यांची पत्नी चंदा, वडील बाबासाहेब व वर्ग तिसरीतील चिरंजीव आदित्य आदींनी गोसेवेस वाहून घेतले आहे. गायींसाठी पत्राशेड उभारले. चारा टाकण्यासाठी लोखंडी चारा दावण तयार केली. परिसरातील अनेकजण भाकड, बेवारस, वृद्ध गायी त्यांच्याकडे आणून सोडत आहेत. मागील दुष्काळी परिस्थितीत तर संपूर्ण तालुका चारा टंचाईने होरपळत असताना निलेशने कुठल्याही शासकीय मदतीविना पदरमोड करून गायींसाठी चारा व पाणी उपलब्ध केले. काही शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीची दाहकता कमी झाल्यावर काही गायी परत नेल्याही आज या गोशाळेत दहा ते बारा गायी आहेत. त्यांचे संगोपन करताना कधी कुटुंबांची जबाबदारी तर अनेकदा शेतीकामे अर्ध्यावर सोडून हा अवलिया गोपालक गायींना चारा मिळावा, यासाठी मदतीची हाक देत वणवण फिरत आहे.लोकसहभागाने दिला आधार..ढाकणे कुटुंबाची धडपड पाहून अनेकांनी आपापल्या परीने हातभार लावला. भगवान बाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष मयुर वैद्य यांनी तीन हजार रूपये, बोधेगावचे अर्जुन अंदुरे यांनी गायींना बांधण्यासाठी दोरखंड, सोनई येथील राहुल आंधळे यांनी तीन हजार रूपये, बालमटाकळीचे उपसरपंच तुषार वैद्य यांनी चार पोते पेंड, इतर अनेकांनी आर्थिक व साहित्य स्वरूपात मदतीचा आधार दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावFarmerशेतकरीcowगाय