९० ग्रामपंचायतींच्या एकूण ८८८ जागांसाठी रिंगणात असलेल्या १ हजार ४२८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतदानासाठी सर्वच वयोगटातील महिला, पुरूष उमेदवारांचा उत्साह दिसून आला. आंबीखालसा, भोजदरी, निमगाव टेंभी व निमगाव बुद्रुक या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ९० ग्रामपंचायतींचे ४१ प्रभाग बिनविरोध झाले असून, बिनविरोध झालेल्या संगमनेर तालुक्यातील उमेदवारांची संख्या १९२ इतकी आहे. संगमनेर तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला, तर २५ गावे अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ५७, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील १४, तर अकोले विधानसभा मतदारसंघातील १९ गावांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. संगमनेर तालुक्यात दुपारी साडेतीनपर्यंत ७२.८२ टक्के मतदान झाले.
------------
फोटो नेम :१५संगमनेर
ओळ : शिबलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांची रांग लागली होती.