अहमदनगर : राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम यांना यंदाचा राष्टÑीय शिक्षक पुरस्कार प्रदान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती कोविंद यांनी आॅनलाईन उपस्थितीत मंगलारम यांना ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान केला. मंगलारम हे राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी १७ वर्षे सेवा केली. त्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा २०१६ चा जिल्हा गुरुगौरव पुरस्कार मिळाला आहे. अमन सोशल क्लबचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला आहे.
मंगलारम यांनी गेल्या वीस वर्षात ७० वेळा रक्तदान केले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इंग्रजी विषय सदस्य, सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे सचिव, नागपूर, हैद्राबादच्या आंतरराष्टÑीय सेमिनारमध्ये सहभाग, दिल्लीच्या कला विभागात प्रशिक्षणासाठी निवड, आंतरराष्टÑीय उपक्रमांमध्ये सहभाग, विविध वृत्तपत्रे, मासिकातून लेखन, शाळेसाठी लाखो रुपयांचा निधी उभारण्यास सहभाग आदी विविध कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.