उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे व तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या फलकाद्वारे शेतकरी बांधवांना गावातील जमिनीचा सुपीकता निर्देशांक कळणार आहे. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर व जमिनीचे ढासळत चाललेले आरोग्य याबाबत गावोगावी प्रशिक्षण तसेच फलकाद्वारे शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याचे मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.
या कामी कृषी पर्यवेक्षक तुळशीराम पवार,राणू आंबेकर, सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश बनकर, शरद लांबे, बाळासाहेब सूळ, चंद्रकांत म्हसे, शिवप्रसाद कोहोकडे, कैलास मकासरे, भिमराज गडधे,बिरू केसकर, आकाश गोरे व स्थानिक शेतकरी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.