शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

संचालकांची वार्षिक सभेकडे पाठ : अहमदनगर जिल्हा बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 2:30 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या ६१ व्या वार्षिक सभेकडे ज्येष्ठ संचालक यशवंतराव गडाखांसह अनेक संचालकांनी ...

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या ६१ व्या वार्षिक सभेकडे ज्येष्ठ संचालक यशवंतराव गडाखांसह अनेक संचालकांनी पाठ फिरविली.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३५ कोटी ७७ लाख रूपये नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना दिली. तसेच भागधारकांना ९ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. त्यासाठी १९ कोटी ६७ लाख रूपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.३१ मार्च २०१८ अखेर १०५२.३३ कोटी रूपयांचे अल्पमुदत पीक कर्ज वाटप केले असून या कर्जाची १५५६.०८ कोटी, तर ६५९.५९ कोटी रूपये येणे बाकी आहे. एकूण कर्ज व्यवहाराच्या रकमेपैकी १३८९.२५ कोटींचे कर्ज सहकारी साखर कारखान्यांना दिले आहे. हे प्रमाण बँकेच्या एकूण कर्ज पुरवठ्याच्या ३४.०८ टक्के इतके आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना संपलेल्या आर्थिक वर्षात ५.९१ कोटी कर्जवाटप केले असून ५.६८ कोटी येणे बाकी आहे. ३१ मार्च २०१८ अखेर सर्व बचतगटांकडे सर्व प्रकारची एकूण ११.८५ कोटी येणे बाकी आहे.आमदार शिवाजी कर्डिले, अरूण जगताप, मोनिका राजळे, यशवंतराव गडाख, चंद्रशेखर घुले, बिपीन कोल्हे, करण ससाणे, सुरेश करपे हे संचालक गैरहजर होते.उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी प्रास्ताविक केले. वैभव पिचड, पांडुरंग अभंग, अरूण तनपुरे, बाजीराव खेमनर, उदय शेळके, राजेंद्र नागवडे, रावसाहेब शेळके, मीनाक्षी साळुंके, चैताली काळे, अंबादास पिसाळ, जगन्नाथ राळेभात आदी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे उपस्थित होते. दत्तात्रय पानसरे यांनी आभार मानले.शिवाजी वाळुंज, मारूती लोखंडे, शांताराम वाळुंज, दिलीप चौधरी, मुक्ताजी पानगव्हाणे, शिवाजी पाचपुते, शिवाजी थोरात, पंडित गायकवाड, रामनाथ राजपुरे, अण्णासाहेब बाचकर व इतर सभासदांनी यावेळी विविध सूचना केल्या.बँकेची २०१७-१८ ची आर्थिक स्थिती (आकडे कोटी रूपयांमध्ये )स्वभांडवल ........... ७८१.९८ठेवी.................... ६२२२.७१बाहेरील कर्जे......... ४४०.०४गुंतवणूक ............ २९९१.००दिलेली कर्जे......... ४०७६.००नफा.................. ३५.७७खेळते भांडवल...... ७७४६.७६१ टक्के व्याज दर सवलतविविध कार्यकारी सेवा संस्थांच्या कर्जदार सभासदांनी मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जाची नियमित परतफेड केल्यास १ टक्के, सहकारी साखर कारखान्यांना १ टक्के, थकबाकी नसणाऱ्या व नियमित कर्ज परतफेड करणाºया पगारदार नोकर संस्था, नियमित कर्ज परतफेड करणाºया व थकबाकी नसणाºया खरेदी विक्री सहकारी संघ व जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थांना १ टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.  याशिवाय बीपीएल गटांना ३ टक्के व एपील गटांना ७ टक्के व्याजदर सवलत देण्यात आली आहे.भूजल प्रारूपास विरोध

ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के यांनी नोटाबंदी, कर्जमाफीसारख्या अडचणींवर मात करून बँकेने ३५ कोटींचा नफा मिळविल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. शेतकºयांना व्याजात सवलत देण्याचा सेवा संस्थांनी प्रयत्न करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. भूजल कायद्याच्या प्रारूपास विरोध करणारा आयत्या वेळचा ठराव त्यांनी मांडला. तो सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.नोकरभरतीचा विषयअशोक गायकवाड यांनी बँकेची नोकरभरती वादग्रस्त होऊन गाजल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. पण प्रत्यक्ष बँकेच्या शाखांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे निवडलेल्या कर्मचाºयांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, मागासवर्गीय कर्मचाºयांना नियमानुसार तत्काळ पदोन्नती द्यावी, अशा मागण्या केल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर