--------------
बागरोजा हडको येथे रस्त्यावर खड्डे
अहमदनगर : बालिकाश्रम रस्ता ते नेप्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बागरोजा हडको परिसरात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथे सततच्या पावसाने रस्त्यावर साधी खडीही शिल्लक राहिलेली नाही. पाऊस थांबल्यानंतरही पालिका प्रशासाने येथील रस्त्यावरील खड्डे बुजविलेले नाहीत. त्यामुळे येथे उडणाऱ्या धुळीने परिसरातील व्यावसायिक, रहिवासी हैराण झाले आहेत. येथील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
--------------
थंडी वाढल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांत उत्साह
अहमदनगर : गेल्या आठवडाभरापासून नगर शहर परिसरात थंडी वाढली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांत उत्साह असून सकाळी फिरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यंदा हिवाळी सुरू होऊनही पहिले काही दिवस थंडीच नव्हती. सतत ढगाळ वातावरण व सुटणाऱ्या वाऱ्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. त्यानंतर मागील आवड्यापासून थंडी वाढल्याने पुन्हा बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची थंडी सध्यातरी कमीच आहे.
--------------
वाढत्या थंडीने गव्हाला फायदा
अहमदनगर : गेल्या आठवडाभरापासून थंडी कायम राहिल्याने गव्हाला फायदा होत आहे. त्यामुळे सध्या गहू जोमात आहे. मागील काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे काही भागात गहू, हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत होता. मात्र, शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी केल्याने रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाला नाही. तसेच वातावरणात बदल होऊन पुन्हा थंडी पडू लागल्यानेही गहू, हरभऱ्याला फायदा होऊ लागला आहे.