अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
बोठे याच्या जामीन अर्जावर खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निर्णय देत बोठे याचा जामीन फेटाळला. जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलेली आहे. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहे. बोठेचा अटकपूर्वचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. फरार बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलिस आहेत. तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे.