बालमटाकळी : दुष्काळी परिस्थितीशी जनता तोंड देत असून देखील बालमटाकळी येथे आठवड्यापासून चोरट्यांचा मात्र धुमाकुळ मात्र सुरूच आहे. बालमटाकळी (ता. शेवगाव) येथील संतोष अर्जुन बागडे या सोनाराच्या घरावर ६ ते ७ अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बागडे यांच्या प्रसंगावधानाने चोरट्यांचा डाव फसला.शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी (ता. शेवगाव) येथील संतोष अर्जुन बागडे यांची सराफ दुकान असून त्यांच्या सोनारगल्लीतील राहत्या घरी पहाटे शनिवारी दोनच्या सुमारास ६ ते ७ अद्न्यात चोरट्यांनी दुकानाच्या व घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लाकडी दारावर मोठ्या दगडी पाट्याने दार तोडण्याचा पर्यन्त करत असताना घरातील सर्वच जन जागे झाले. दाराला आतील बाजूने दार उघडू नये. यासाठी दार घट्ट दाबुन धरले. त्यात चोरट्यांनी धारदार शास्रांनी दार फोडण्याचा प्रयन्त करताना घरातील संतोष अर्जुन बागडे यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे घरातील लोक जोरजोरानेओरडू लागल्याने चोरटे पसार झाले.घटनेची माहीती येथील ग्रामस्थानी गावचे उपसरपंच तुषार वैद्य आणि विक्रम बारवकर यांना दिल्याने यांनी बोधेगाव दूरक्षेत्राला संपर्क केला असता बोधेगाव दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल आसाराम बटूळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत एकसिंगे, पोलीस कॉन्स्टेबल बप्पसाहेब धाकतोडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा रात्रीच बालमटाकळी त हजर होऊंन रात्रीच संपूर्ण परिसर पिंजून काढला. नंतर सकाळी दहा वासता शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत काळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत एकसिंगे, संदीप दरवडे, सोमनाथ घुगे, अभय लकडे यांनी सदरील घटनेची कसून पाहणी केली.
बालमटाकळीत चोरट्यांच्या धुमाकुळ, धाडसी चोरीचा डाव फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 1:55 PM