अहमदनगर :
दशमीगव्हाण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मालू काळे यांची, तर उपाध्यक्षपदी गंगाधर तात्याबा काळे यांची बिनविरोध निवड झाली.
सेवा संस्था कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. शेख यांच्या अध्यक्षतेखालील बैठक झाली. यू. एस. कांबळे यांनी त्यांना मदत केली.
अध्यक्षपदासाठी बाळासाहेब मालू काळे यांच्या नावाची सूचना सुधीर काकासाहेब काळे यांनी मांडली. त्यास गोरख माहळू काळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी गंगाधर काळे यांच्या नावाची सूचना लक्ष्मण दादासाहेब शिंदे यांनी मांडली. त्यास विजय मनोहर काळे यांनी अनुमोदन दिले.
बैठकीस संस्थेचे नूतन संचालक बाळासाहेब राधाकिसन काळे, विजय मनोहर काळे, पोपट मोहन काळे, गोरख महाळू काळे, सुधीर काकासाहेब काळे, भाऊ धोंडिबा काळे, लक्ष्मण दादासाहेब काळे, पोपट केरू कांबळे, सुमन मुरलीधर काळे, सलिमा बाबा शेख, आदी संचालक उपस्थित होते.
उपसरपंच बाबासाहेब काळे, माजी सरपंच भाऊसाहेब काळे, बाजार समितीचे संचालक उद्धव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळे, सूर्यकांत काळे, जयसिंग सुखदेव काळे, बाबा शेख आदी उपस्थित होते.