- शेखर पानसरेसंगमनेर : राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाड्यावस्त्यांवरील शाळा बंद करायच्या आणि तेथील मुलांनी शिक्षण घेण्याऐवजी कुणाच्या तरी हाताखाली मजुरी करायची. असे धोरण राज्य सरकारचे असेल तर हे सरकार श्रीमंत धार्जिणे धोरण राबवत आहे. गरीब आणि वंचितांचे करिता त्यांचे धोरण नाही. ही वस्तुस्थिती जशी मोठ्यांच्या करता होती, ती आता बालकांपर्यंत जाऊन पोहोचली. अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या संदर्भाने रविवारी (दि. १६) संगमनेरातील पत्रकारांनी आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
'हे सरकार श्रीमंत धार्जिणे धोरण राबवत आहे', कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर बाळासाहेब थोरातांची टीका
By शेखर पानसरे | Published: October 16, 2022 5:30 PM