कोरोना काळात कृषी उत्पादन उलाढालीतून देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी, जगाचा पोशिंदा परिस्थितीसमोर न डगमगता, न थकता जगाला पोसण्यासाठी सरसावला आहे. मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना कोरोना रोगामुुुळे कमी भावात माल विकावा लागला. त्यात अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट यासारख्या आपत्तीला तोंड द्यावे लागले. आता पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले आहेत. खरिपाची पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मजुरीचे दर वाढल्याने व बैलांचा अभाव असल्याने शेतकरी तांत्रिक शेतीकडे वळला आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणीची कामे कमी वेळात उरकून घेतली जात आहेत. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद असल्याने पिकवलेला माल बाजारात कमी दराने विकला गेला. तर काही माल बांधावर सडून खराब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही.
........
नांगरटीच्या दरात वाढ
मजुरीबरोबर डिझेलचे दर वाढल्याने नांगरटीच्या दरातही वाढ झाली आहे. नांगरणी ट्रॅक्टरने प्रति एकर दीड हजार रुपये, शेतीची लेव्हल प्रतिएकर ७०० रुपये आहे, मजूर रोजगार ५०० रुपये आहे. या खर्चाचा ताळमेळ शेतकरी उसनवारी करून करीत आहे.
--------
------
कोरोना रोगामुळे पिकविलेल्या मालाचे समाधानकारक पैसे मिळाले नाहीत. शेतीत उत्पन्न कमी व खर्च जास्त असा प्रकार होत असून शेतीच्या खर्चासाठी लागणारा पैसा कुठून उभा करायचा असा प्रश्न आहे. गतवर्षीची अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीने, कोरोनामुळे सगळेच आर्थिक गणित बिघडले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.
-बाळासाहेब फटांगडे, शेतकरी.
......१५ नांगरट