लोकमत न्युज नेटवर्कनेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील खडका येथील शेतक-यांनी नियमित विज बिल भरुनही कृषिपंपाचा विज पुरवठा गेल्या सहा दिवसांपासून खंडीत केला आहे. यामुळे महावितरणच्या निषेधार्थ खडक्याचे माजी सरपंच परवेझ पठाण यांच्या नेत्तृत्वाखाली आज सकाळी साडेअकरा वाजता खडका येथील विद्युत रोहिञाजवळ विज बिल समोर ठेवून बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी सरपंच पठाण म्हणाले, शेतकरी अर्थिक संकटात भरडला जात आसतांना महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरु आहे. शेतक-यांनी नियमित विज बिल भरणा करुनही विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे कारण समजू शकले नाही. शेतक-यांच्या पिकांचे विज पुरवठा खंडीत केल्याने मोठे नुकसान होत आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतक-यांना जिवंतपणी मरण यातना सोसण्याची वेळ आली आहे. याप्रसंगी आंदोलनात आनंदा माळी, अंबादास पवार, भाऊसाहेब भणगे, सुभाष जगताप, कानिफनाथ सावंत, सुनिल सावंत, किशोर भांगे, नितीन मुटकुळे, रज्जाक पठाण, संतोष बर्डे, तुकाराम जगताप, रघूनाथ बानकर, वसंत सावंत सहभागी झाले होते.