श्रीगोंदा : तालुक्यातील घोगरगाव येथे सापडल्या बनावट नोटाप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी बारामती येथील दोघांना शनिवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बनावट नोटांचे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता श्रीगोंदा पोलिसांनी व्यक्त केली आहे. अतुल आगरकर, श्रीकांत माने अशी या आरोपींची नावे आहेत. बनावट नोटा कुणाला किती लागतात याची आॅर्डर श्रीकांत माने हा घेत होता. बनावट नोटा विक्रीतून श्रीकांत माने हा कोट्यधीश झाला आहे. त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी बनावट नोटांचे तयार करण्याचे साहित्य व बनावट नोटा एका विहिरात फेकून दिले असल्याची पोलिसांची माहिती आहे. श्रीकांत माने व पुण्यातील एका महिलेशी घनिष्ठ संबंध आहेत. सदर महिला पुण्यात बनावट नोटा विकण्यासाठी मध्यस्थी करीत अशी माहिती पोलिसांना समजली आहे. नोटांच्या कारखान्याच्या सुगावाबनावट नोटा तयार कारण्याचा छापण्याचा पुणे जिल्ह्यात थाटला होता. या कारखान्यातून परराज्यात बनावट नोटा मागणीनुसार पाठवल्या जात होत्या. पोलिसांना बनावट नोटांचा कारखाना कुठे आहे? याचा सुगावा लागला आहे. लवकरच याचे बिंग फुटणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सतिश गावीत यांनी दिली.
बनावट नोटा प्रकरणी बारामतीतील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 12:53 PM