.................
डॉक्टरांशी समिती साधणार संवाद
अहमदनगर : महापालिकेने नियुक्त केलेली आराेग्य समिती शहरातील डॉक्टरांशी ऑनलाईन संवाद साधणार असून, डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत. तसेच काही सूचनाही महापालिकेच्या वतीने केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
......
लॉकडाऊनमुळे कांदा चाळीत
अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे कांदा चाळीत टाकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहेत. यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने कांदा चाळीत टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
....
लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
अहमदनगर: महापालिकेने इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात मोफत लसीकरण करावे. त्यासाठी मंगल कार्यालयासह आवश्यक सुविधा सकल राजस्थानी युवक संघ, जितो अहमदनगर, हाेलसेल जॉगरी असोसिएशन, बडीसाजन ओसवाल युवक संघ, आयसीएआय यांच्या वतीने उपलब्ध करून दिले जाईल, आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
....
महामार्गावरील पुलाला रंग
अहमदनगर: नगर- औरंगाबाद महामार्गावरील जेऊर येथील पुलाला काळा व पांढरा रंग देण्यात आला असून, रस्त्यांवर दुभाजकाच्या बाजूने पांढरा रंग देण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहन चालविणे यामुळे सुलभ झाले आहे.
....
रुग्ण व नातेवाईकांना मोफत जेवण
अहमदनगर: उन्नती संस्थेच्या वतीने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्यात येत असून, रविवारी दिवसभरात १२० जणांना जेवण पोहोचते करण्यात आले आहे. मागणीनुसार जेवणाचे डबे पोहोचते करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
...
शेतीच्या मशागतीला वेग
अहमदनगर: वातावरणातील बदलामुळे उकाडा वाढला असून, यंदा मान्सून वेळेवर येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली असून मशागतीला वेग आला आहे.
....