अहमदनगर : उन्हाचा पारा वाढल्याने थंडपेयांना मागणी वाढली आहे़ बहुतांशी विक्रेते थंडपेय तयार करताना अशुद्ध बर्फ वापरत असून, स्वच्छतेचीही काळजी घेताना दिसत नाही़ अन्न, औषध प्रशासन शहरासह जिल्ह्यात थंडपेयांच्या स्टॉलची तपासणी करणार आहेत. यात अशुद्धता आढळली तर कारवाई करणार असल्याचे एफडीचे सहाय्यक आयुक्त बालू ठाकूर व किशोर गोरे यांनी सांगितले़उन्हाळ्यात नागरिकांकडून थंडपेयांना मोठी मागणी वाढते़ नगर शहरासह जिल्ह्यात चौकाचौकात व रस्त्यांवर रसवंतीगृह, ज्यूस सेंटर, लिंबू सरबत, ताक-मठ्ठा, आईसक्रीम विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात आलेले आहेत़ नगर शहरात परवाना असलेले चारच बर्फाचे कारखाने आहेत़ खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाचा रंग हा पांढरा तर इतर कामांसाठी वापरण्यात येणाºया बर्फ निळ्या रंगात तयार करण्याचे शासनाचे कारखान्यांना आदेश आहेत़नगर शहरात मात्र केवळ पांढºया रंगाचाच बर्फ दिसतो़ बहुतांशी विक्रेते थंडपेयांमध्ये वापरण्यासाठी घरीच नळाच्या पाण्यापासून बर्फ तयार करतात़ हा बर्फ तयार करताना शुद्धतेची कोणतीच काळजी घेतलेली दिसत नाही़ असा बर्फ आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो़स्वच्छ पाण्याची हमी कागदावरचखाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांना शुद्ध पाणी देण्यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वी शासनाने आदेश काढला होता़ हॉटेलमध्ये दर्शनी भागात बोर्ड लावून त्यावर ‘येथे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळते’ अशी सूचना टाकणेही बंधानकारक केले होते़ नगर शहरात मात्र अपवाद वगळता कोणत्याच हॉटेलमध्ये असे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत़ ग्राहकांना हॉटेलमध्ये गेल्यानंतरही शुद्ध पाणी पिण्यासाठी बाटली विकत घ्यावी लागते़ अन्न, औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे़ज्या अन्नपदार्थांमध्ये बर्फाचा वापर केला जातो तो बर्फ शुद्ध असणे बंधनकारक आहे़ थंडपेय विक्रेत्यांनी परवाना असलेल्या कारखान्यांकडूनच अधिकृत बर्फ खरेदी करून त्याचा वापर करावा़ तसेच अन्नपदार्थ तयार करताना व विक्री करताना स्वच्छता ठेवणेही बंधनकारक आहे़ तपासणी मोहिमेत खराब बर्फाचा वापर अथवा अस्वच्छता आढळून आली तर थंडपेय विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल़ नगर शहरासह जिल्ह्यात थंडपेय स्टॉलची तपासणी राबिवण्यात येणार असल्याचे अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त किशोर गोरे व बालू ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
सावधान... थंड पेयांमध्ये अशुद्ध बर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:21 AM