विखे यांनी मंगळवारी साई संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांची पाहणी करून उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी संस्थानच्या सभागृहात सीईओ भाग्यश्री बानायत यांच्याशी चर्चा केली. या वेळी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, संस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, बीडीओ समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. गोकूळ घोगरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, संस्थानचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. कडू, डॉ. मैथिली पितांबरे, श्रद्धा कोते, संचालक तुषार शेळके, जितेंद्र गाढवे, प्रतापराव कोते उपस्थित होते.
साईबाबा रुग्णालयात साठ बेड ऑक्सिजन व वीस बेड व्हेंटिलेटर तसेच साई आश्रमामध्ये दोनशे खाटांचे आयसोलेशन सेंटर सुरू करावे. साईबाबा रुग्णालयाचा अन्य भाग व साईनाथ रुग्णालयात पूर्णपणे नॉनकोविड सेवा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. संस्थानने उभारलेला ऑक्सिजन प्लांट विजेच्या दृष्टीने खर्चीक आहे. त्यावर विसंबून राहू नये, ठेकेदारी पद्धतीने तात्पुरते वीस आरोग्य कर्मचारी भरावेत, राहाता सरकारी रुग्णालयामार्फत आलेल्या कोविड रुग्णांवरच संस्थान रुग्णालयात उपचार करावेत, असेही त्यांनी सांगितले.
..............
नगर-मनमाड मार्गासाठी केंद्राकडून साडेचारशे कोटींचा निधी मंजूर करून घेतला. वर्कऑडरही झाली, पावसामुळे कामाला उशीर होतोय. पूर्ण क्षमतेने काम सुरू व्हायला पंधरा दिवस लागतील. तोवर खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंधरा दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर ठेकेदाराला काळे फासू.
- डॉ. सुजय विखे, खासदार