अहमदनगर : खेळामुळे शरीर संपन्न होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळाला महत्व दिले पाहिजे. शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे, असे मत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.३२ व्या राज्यस्तरीय क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी शर्मा बोलत होते. यावेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप, उपमहापौर श्रीपाद छिंदम, सचिव प्रा. माणिक विधाते व क्रॉम्प्टनचे एन. रमेशकुमार, गणेश गोंडाळ उपस्थित होते.शर्मा म्हणाले, पुर्वी खेळापेक्षा शिक्षणाला जास्त महत्व दिले जायचे. आता प्रसिध्दी आणि पैसा मिळू लागल्याने तसेच शरीर सृदृढ राहत असल्याने खेळाचे महत्व वाढले आहे. सद्यस्थितीत क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. खेळामुळे शरीरही सृदृढ राहत आहे. प्रसिध्दीमुळे समाजप्रबोधनाचे काम करता येत आहे. ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी उदघाटनीय सामना महिलांच्या संघात खेळविण्यात आला.
ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे - रंजनकुमार शर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 2:04 PM
खेळामुळे शरीर संपन्न होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळाला महत्व दिले पाहिजे. शिक्षणाबरोबर खेळही महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहावे, असे मत पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्र्मा यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देराज्यस्तरीय क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन