अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील दिहगाव-ने येथील स्व. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्रात मधमाशी पालन व्यवसायाच्या प्रशिक्षणास मंगळवारी प्रारंभ झाला
राष्ट्रीय मधमाशी पालन मंडळ व कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित युवकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या पार्शभूमीर शेवगाव तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कार्यक्षेत्रातील २५ युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. या युवकांना दि.२२ ते २८ फेब्रुवारी या काळात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शाम सुंदर कौशिक यांनी प्रशिक्षणाबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, मधमाशी पालन प्रशिक्षणासाठी राज्यातून कृषि विज्ञान केंद्राची निवड करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत १५० ते २०० ग्रामीण युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियंता राहुल पाटील यांनी केले तर, नारायण निंबे यांनी आभार मानले. प्रशिक्षणासाठी माणिक लाखे सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, प्रविण देशमुख आदींनी परिक्षण घेतले.
...