तळेगावात उन्नत शेती विकास कार्यक्रमास सुरुवात
By admin | Published: May 29, 2017 12:32 PM
कृषी विभागातर्फे उन्नत शेती विकास कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
लोकमत आॅनलाइन तळेगाव दिघे : कृषी विभागातर्फे उन्नत शेती विकास कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सरपंच प्रमिला जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नुकतेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शासनाच्या कृषी विषयक नवनवीन योजना, शेतकरी बचत गट, कृषी यांत्रीकीकरण, जलसंधारण, मागेल त्याला शेततळे या व इतर योजनांची माहिती देण्यात आली. कृषी अधिकारी संदिप जोर्वेकर यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. दहा शेतकरी मिळुन बचत गट करणे आवश्यक असल्याचे सांगत आता कोणत्याही योजनेचा निधी प्रत्यक्ष शेतक-याच्या खात्यावर जमा होणार आहे. तेव्हा शेतकरी बचत गटाशिवाय योजनांचा लाभ घेता येणार नसल्याचे जोर्वेकर यांनी सांगितले. कार्यक्रमात माती परिक्षण केलेल्या माती आरोग्य कार्डचे संबधित शेतक-यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला रमेश दिघे, भाऊसाहेब दिघे, संतोष दिघे, मच्छिंद्र दिघे, सुनिल दिघे, आण्णासाहेब दिघे, पंढरिनाथ इल्हे, विठ्ठल दिघे, तुकाराम दिघे, शरद भागवत, सोपान दिघे, चांगदेव दिघे, संजय दिघे, दगु दिघे, लतीफ शेख, वाळीबा दिघे, बबन दिघे, रोहित खेडकर, तबाजी दिघे, बाबासाहेब खोकराळे उपस्थित होते.