श्रीरामपूर : ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली १९३१ मध्ये ओबीसींची जनगणना होऊ शकते. मात्र स्वतंत्र भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणातील समाजाची स्वतंत्र जनगणना का होत नाही? असा सवाल करत तातडीने जनगणना करावी, अशी मागणी बागवान, आतार, तांबोळी, कुरेशी, रंगरेज, अन्सारी, नालबंद समाजांच्या प्रमुखांनी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ई- मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. २०२१ मध्ये होत असलेल्या जनगणनेत ओबीसी असा स्वतंत्र तक्ता तयार करावा. केंद्र सरकारने त्याकडे डोळेझाक करू नये अन्यथा जनगणनेत समाज सहभाग घेणार नाही, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवून केंद्र सरकारला पाठविली जाईल, असे ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनयझेशनचे जिल्हा अध्यक्ष फय्याज बागवान, जिल्हा संघटक शफीक बागवान, राहुरी तालुकाध्यक्ष अतीक बागवान, अनिस तांबोळी, शफीक आतार, गुलाम गौस कुरेशी, गफुर बेपारी, इस्माईल कुरेशी म्हटले आहे.
---------