रविवारी विसापूर येथील आठवडे बाजार असतो. व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले.
सर्व दुकाने बंद असताना काही लोक वेगवेगळ्या सबबीखाली इकडे तिकडे भटकत होते. विसापूर येथे संचारबंदीच्या काळात विनाकारण भटकंती करणाऱ्या लोकांवर बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अजिनाथ खेडकर व होमगार्ड सागर लगड यांनी दंडात्मक कारवाई केली. दिवसभर रस्त्यावर थांबून अजिनाथ खेडकर व सागर लगड आपले कर्तव्य चोख बजावत होते.
............
कोरोना आपल्या विळख्यात अनेक लोकांना घेत आहे. परिसरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकार व ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सुरक्षित रहावे. विनाकारण कोणीही घराबाहेर न पडता स्वत:ची काळजी घ्यावी.
- अरविंद जठार, सरपंच, विसापूर
........
फोटो - विसापूर
रविवारी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करताना बेलवंडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी.