शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

खबरदार....कुणाला एप्रिल फूल केले तर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 1:36 PM

१ एप्रिल रोजी अनेक जण मित्र, नातेवाईकांना काही तरी खोटे सांगून एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे मेसेज सोशल मीडियावर टाकू नयेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

अहमदनगर : १ एप्रिल रोजी अनेक जण मित्र, नातेवाईकांना काही तरी खोटे सांगून एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे मेसेज सोशल मीडियावर टाकू नयेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी मंगळवारी प्रसिद्धपत्रक काढले आहे.  मित्र, नातेवाईकांची चेष्ठा अथवा केवळ  एक आनंदाचा भाग म्हणून आपल्याकडे १ एप्रिलला काहीतरी गंभीर घडल्यासारखे मसेज पाठविणे, कुणाचा तरी खोटा निरोप देणे तसेच काहीतरी घडले आहे असे सांगण्याची पद्धत आहे. यातून कुणाचे नुकसान व्हावे, असा हेतू नसतो. परंतु यंदा मात्र परिस्थितीवेगळी आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, जमावबंदी व संचारबंदी आहे. अशा पस्थितीत मजाक म्हणून व्हायरल झालेल्या मेसेज अथवा व्हीडिओमुळेही लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यातून प्रशासनावर ताण पडू शकतो. अशी शक्यता गृहित धरून पोलीस प्रशासनाने एप्रिल फूल करणा-यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. एप्रिल फूल संदर्भात कुणी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले तर संबंधित व्यक्ती व सदर व्हॉटअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.  ग्रुप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना सूचना द्याव्यात तसेच सेटींगमध्ये जाऊन ग्रुप अ‍ॅडमिन मेसेज सेंड करील असे सेंटिग करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.सायबर पोलिसांचा वॉच १ एप्रिलच्या दिवशी अथवा त्यानंतर अफवा पसरविणारे मेसेज, व्हीडिओ कुणी सोशल मीडियावरून व्हायरल करू नयेत. यासाठी सायबर पोलीस लक्ष्य ठेवून आहेत.  ज्यांच्याकडून असे मेसेज, व्हीडिओ व्हायरल केले जातील त्यांचा शोध घेऊन तत्काळ गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीApril Fool Dayएप्रिल फूल