अकोले/भंडारदरा : भंडारदरा धरणात आज सकाळी (१६ आॅगस्ट) ६ वाजता १० हजार ३६६ दशलक्ष घनफूट झाला होता. यामुळे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असल्याची पाटबंधारे असल्याचे कार्यकारी उपअभियंता अभिजित देशमुख यांनी जाहीर केले. धरणातून रविवारी सकाळी ६ वाजता ३ हजार २६८ क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
११०२६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे भंडारदरा धरण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला भरत असते, असा इतिहास आहे. परंतु यंदा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस उशीरा आल्याने धरण एक दिवस उशीरा म्हणजे १६ आॅगस्ट रोजी भरले. पाणी पातळी राखण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
धरणाच्या पाणलोटात गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे धरणात मोठ्या प्राणात पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदरा धरणावरील वाकी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.तर निळवंडे धरण ७३.६१ टक्के भरले आहे.