शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

भंडारदरा आज भरणार?

By admin | Published: August 08, 2014 11:37 PM

जिल्ह्याला नवसंजीवनी देणारे भंडारदरा जलमंदिर शनिवारी तांत्रिकदृष्ट्या भरणार आहे.

अकोले/राजूर : जिल्ह्यातील अन्य भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असताना अकोले तालुक्यात मात्र धुवॉधार सरी कोसळत आहेत. शेतीकामांना गती मिळण्यासाठी पावसाच्या उघडीची वाट पाहिली जात असून उत्तर नगर जिल्ह्याला नवसंजीवनी देणारे भंडारदरा जलमंदिर शनिवारी तांत्रिकदृष्ट्या भरणार आहे.शुक्रवारी भंडारदरा धरणाने दहा टी.एम.सी.चा टप्पा ओलांडला. दहा हजार पाचशे द.ल.घ.फू पाणीसाठा झाल्यावर धरण तांञिकदृष्ट्या पूर्ण भरल्याची घोषणा जलसंपदाकडून केली जाते. पाणलोटातील पावसाचा जोर लक्षात घेता तशी घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील टिटवी, पाडोशी, सांगवी, बलठण, घाटघर, वाकी, आंबीत, कोथळे, येसरठाव, शिळवंडी आदी सर्व १३ लघूपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत असून निळवंडे व आढळा धरणाचे पोटात झपाट्याने पाणी वाढत आहे. तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी झाले असून पावसाने थोडी उघडीप द्यावी असे शेतकऱ्यांना वाटते.दरम्यान भंडारदरा जलाशय, रंधा धबधबा, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, पांजरे, उडदावणे, वाकी, निळवंडे परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. तरुणाई निसर्ग कवेत घेण्यासाठी धजावत आहे. चंदेरी प्रपातांच्या जलधारा अंगावर घेण्यासाठी बंबाळ्या रानात झुंबड उडताना दिसते. रंधा धबधबा व ‘स्पील वे’जवळ मोठी गर्दी होते. वाहतुकीची कोंडी ठरलेली असते. या भागात तरुणाईच्या उत्साहाला उधान येते. या भागातील गर्दी लक्षात घेऊन सध्या राम भरोसे असलेल्या धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहे. शिघ्र कृती दलाच्या धरतीवर आपतकालीन मदतीसाठी पोलिसांचे फिरते पथक येथे असावे अशी मागणी होत आहे. भंडारदरा धरणात ९ हजार ८०८, (९० टक्के), निळवंडेत ४ हजार ७३२ (७५ टक्के), तर आढळा ५६२ (५३टक्के) दशलक्ष घनफूट साठा झाला आहे. मुळा नदीपाञातून ५ हजार ६३८ क्युसेकने विसर्ग सुरु आहे.(तालुका प्रतिनिधी)