अहमदनगर : भुईकोट किल्ल्यात स्वच्छता करावी. वाढलेले गवत, झाडी झुडपे काढावीत. भींतीवर रोज स्वच्छता करावी, स्वरंक्षण कठडे लावावेत, बांधकाम ढासळत आहे. त्यामुळे किल्ल्याची दुरुस्ती करावी अशी मागणी भिंगार काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष आर. आर.पिल्ले, शामराव वाघस्कर, अॅड. नरेंद्र भिंगारदिवे, अॅड.साहेबराव चौधरी , सुभाष त्रिमुख, संजय झोडगे, नियाज पठाण, संतोष फुलारी, संतोष धीवर, ईश्वर जगताप, संजय खडके, दीपनंदन लोखंडे, ज्ञानदेव भिंगारदिवे, सुनीता साळवी, मागार्रेट जाधव, रजनी ताठे, मंदाकिनी होडगे, अलका बोर्डे, जमीला शेख, किरणताई अळकुटे, सुवर्णा ओहोळ आदी पदाधिका-यांनी केली आहे.किल्ला हा लष्कराच्या ताब्यात आहे. त्यामुळे संरक्षण कायद्यामुळे काहीही करता येत नाही. सर्वासाठी पाहण्यासाठी खुला असला तरी लोकांना माहिती नाही. जे येतात त्यांना काहीही माहिती मिळत नाही. किल्ला हा पर्यटन स्थळात वर्ग करून राष्ट्रीय स्मारक करावे. त्यामुळे प्रचार करता येईल. शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय मार्ग आहेत, असे पिल्ले यांनी प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शामराव वाघस्कर म्हणाले, अनेक ठिकाणी जाणारे भुयारी मार्ग खुले झाले तर जगातून पर्यटक येतील. भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी भिंगार काँग्रेस गेली ५० वर्षे लढा देत आहे. भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी राजकीय पक्ष, नागरिक यांनी एकत्र येऊन पाठपुरावा करणे गरजेचे आहे.याबाबत लवकरच लष्करी अधिकारी व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेणार असल्याचे भिंगार कॉग्रेसने म्हटले आहे.