शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बीडीओंनी थुंकले पाणी : जामखेड तालुक्यातील हळगावमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:56 AM

जामखेड तालुक्यातील हळगाव (ता. जामखेड) येथे छावणी व टँकर तपासणीस आलेल्या पथकाने थेट छावणीत बसूनच तपासणी अहवाल प्रश्नावलीच्या आधारे तयार करण्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कैद झाला.

सत्तार शेखहळगाव : जामखेड तालुक्यातील हळगाव (ता. जामखेड) येथे छावणी व टँकर तपासणीस आलेल्या पथकाने थेट छावणीत बसूनच तपासणी अहवाल प्रश्नावलीच्या आधारे तयार करण्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये कैद झाला. विशेष म्हणजे या पथकात पाथर्डीचे गटविकास अधिकारीही (बीडीओ) होते. त्यांनी गावात जाऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याआधीच हा अहवाल तयार केला.‘लोकमत’ने शनिवार (दि.११) च्या अंकात ‘टँकर गेले कुण्या गावा’ या मथळ्याखाली दुष्काळग्रस्त भागातील टँकर व्यवस्थेचे स्टिंग आॅपरेशन केले होते. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने स्टिंग आॅपरेशन झालेल्या गावांच्या तपासणीसाठी बाहेरील तालुक्यातील पथकांची नेमणूक केली. त्यानुसार गुरूवारी (दि.१६) पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पाथर्डी पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक सचिन घोडके व लक्ष्मण गिरी या तीन सदस्यांच्या पथकाने हळगावला भेट दिली. सुरवातीला पथकाने हळगाव येथील चौंडी रोड परिसरात असलेल्या ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या चारा छावणीची तपासणी केली. तेथे जनावरांना टॅग लावलेले नव्हते. लसीकरणाबाबत डॉक्टरने कोणतीच नोंद केलेली नव्हती. कोऱ्या पानावर सह्या केलेल्या होत्या. शिक्काही नव्हता. चारा दर्जा तपासणी अहवालही नव्हता.छावणी तपासणीनंतर पथकाने टँकर तपासणीस जायचे असल्याचे म्हणताच येथे सगळे जण आहेत, इथेच अहवाल तयार करा, असे काही जण म्हणाले. पथकानेही संवेदनशीलपणा न दाखवता छावणीतच गावाला पाणी पुरवठा करणाºया टँकर तपासणीचा अहवाल सोबत आणलेल्या प्रश्नावलीच्या सहाय्याने बनवला. यावेळी गावाला मंजूर खेपानुसार पाणी पुरवठा होतो. मात्र होणारा पाणी पुरवठा दूषित स्वरूपाचा होत असल्याचे अनेकांनी सांगितले. दरम्यान पाणी तपासणीसाठी नमुने घेणाºया आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना तपासणी अहवाल देता आला नाही.ग्रामसेवक अंधारे यांनी नागरिकांच्या दूषित पाणी पुरवठ्यासंदर्भात तक्रारी असल्याचे पथकाला सांगितले. पाणी पुरवठा करणारा उद्भवच दूषित आहे. लवकरच नव्या उद्भवातून पाणी पुरवठा होईल, असे पथकाला टँकर ठेकेदाराकडून सांगण्यात आले. टँकरच्या जीपीएस मॅपिंगचा अहवाल ग्रामसेवकाकडे नव्हता.उपसरपंच अशोक रंधवे व सुशेन ढवळे यांनी गावातील नागरिकांशी भेटून टँकरद्वारे कसा पाणी पुरवठा होता यासंबंधीचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी केली. परंतु पथकाने ही मागणी धुडकावून लावून दुसºया छावणीला भेट देण्याचा निर्णय घेतला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, उपसरपंच अशोक रंधवे, सुशेन ढवळे, माजी सरपंच तात्याराम काळे, ग्रामसेवक काशिनाथ अंधारे, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब ढवळे, सुनील ढवळे, मुरलीधर ढवळे, विठ्ठल ढवळे, गणेश ढवळे, अशोक ढवळे यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...अन् बीडीओंनी थुंकून टाकले पाणीतपासणी पथक छावण्यांची तपासणी करून परतीच्या दिशेने निघत असतानाच उपसरपंच अशोक रंधवे यांनी पथकाने टँकरद्वारे पुरवण्यात येणारे दूषित पाणी पहावे, असा आग्रह धरल्यानंतर पथकातील बीडीओ मुंडे यांनी बसस्थानक परिसरातील दलित वस्तीला भेट दिली.  ठिकाणी माठातील पाणी पथकाने पिऊन दाखवावे, असा आग्रह उपसरपंच रंधवे व महिलांनी धरला. बीडीओ मुंडे यांनी एक घोट पाणी तोंडात घेताच लगेच थुंकून टाकले. पाणी कडवट व खारट असल्याचे मुंडे यांनी कबूल केले.च्टँकरच्या पाण्यात टीसीएल टाकूनच पाणी नागरिकांना द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.हळगावच्या दोन्ही छावण्या तपासल्या. चारा, पाणी, निवारा यांची व्यवस्था चांगली आहे. परंतु इतर त्रुटी आढळल्या. दलित वस्तीला भेट दिली. तेथील पाणी दूषित होते. टँकरचे पाणी देताना टीसीएल वापरावे, अशा सूचना ग्रामसेवक व सरपंच यांना दिल्या आहेत. हळगावच्या तपासणीचा गोपनीय अहवाल लवकरच जिल्हाधिका-यांना सादर करून वस्तुस्थिती कळवली जाईल. - सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी, पाथर्डीगावातील नागरिकांशी चर्चा करा, गावात भेट द्या, अशी पथकाकडे विनंती करूनही त्यांनी छावणीत बसूनच टँकरच्या तपासणीचा अहवाल बनवला. अनेकदा विनंत्या केल्यानंतर गाव सोडताना पथकाने दलित वस्तीला भेट दिली. तेथील पाणी दूषित आढळून आले. प्रशासन कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करते हा प्रश्न आहे. - अशोक रंधवे, उपसरपंच, हळगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय