लॉकडाऊनमुळे पतसंस्थेपुढे कर्ज वसुली, ठेवीत वाढ त्यावरील व्याज अदा करणे, कर्ज वितरण व वसुलीचे मोठे आव्हान होते. संचालक ॲड. सुभाषचंद्र बिहाणी, अनिल पवार, दिवाकर कोळसे, अरविंद शहाणे, शेखर डावरे, अनिल डाकले, भरत साळुंके, रमाकांत खटोड, अभिजीत रांका, कांतीलाल मुथ्था, बद्रीनारायण शर्मा, प्रमोद बिहाणी, प्रभाकर जाधव, मदनलाल सोमाणी, दीपक सीकची, आनंद दायमा, जिजाबाई शिंदे, मंजुश्री कुऱ्हे, व्यवस्थापक संजय नागले, शाखा व्यवस्थापक भरत शिंदे, श्रीकांत काटेकर, वैभव कडू आदींच्या प्रयत्नातून पतसंस्थेने प्रगतीची वाटचाल सुरु ठेवली. संस्थेपुढील आव्हानावर मात करीत नफा मिळवण्यात यश आले.
संस्थेला ढोबळ नफा ८० लाख ७६ हजार झाला आहे. संस्थेकडे एक कोटी २६ लाख भाग भांडवल असून ४५ कोटीच्या ठेवी आहेत. ३४ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक १६ कोटी ३१ लाख असून स्थावर मालमत्ता एक कोटी २० लाखाची झाली आहे असे खटोड यांनी सांगितले.
---------