कोपरगाव : शहरातील टिळकनगर येथील शिवनारायण चंद्रकांत गंगुले यांच्या राहत्या घरासमोर त्यांच्या मालकीची बजाज कंपनीची पल्सर ( क्र.एम.एच.-१७, सी.ई.६१९७) दुचाकी पेटवून दिली. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
काहीतरी ज्वालग्रही पदार्थ टाकून ही दुचाकी पेटवून दिली आहे. याप्रकरणी शिवणारायण गंगुले यांच्या फिर्यादीवरून गोकुळ उर्फ तुषार राजेंद्र दुशींग (रा.टिळकनगर, कोपरगाव) याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.एच.गायमुखे करीत आहेत.