- सुधीर लंके अहमदनगर : सन २०१९ मध्ये जिल्ह्यात टँकरच्या बोगस खेपा दाखवून शासकीय बिले काढण्यात आल्याचे पुरावेच समोर आले आहेत. ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हे पुरावे जमविले आहेत. विशेष म्हणजे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून वावरलेला कार्यकर्ता टँकर ठेकेदार असून त्यांच्याबाबतच तक्रार झाली आहे.अनुदानावर १०१ कोटी रुपये खर्च झाले आहे. मात्र, टँकर पुरवठ्यामध्ये अनियमितता झाली आहे. ठेकेदारांनी ‘जीपीएस’प्रणाली न बसविताच टँकर सुरू केले हे वास्तव ‘लोकमत’ने ११ मे रोजीच्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणले होते. त्यानंतर ‘जीपीएस’ यंत्रणा सतर्क केल्याचा दिखावा ठेकेदार व जिल्हा प्रशासनाने केला. त्यात बनावटगिरीची तक्रार आहे.पारनेर पंचायत समितीने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार या टँकरने १२ मे ते १६ मे या कालावधीत वाघुंडे खुर्द गावाला पाणी पुरवठा केल्याचे दिसत आहे.कोण आहे टँकर ठेकेदार? : अण्णा हजारेंसोबतभ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात विविध व्यासपीठावर दिसणारे सुरेश पठारे हे ठेकेदार संस्थेचे संचालक आहेत. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, तक्रारदारांनी ‘जीपीएस’चे खोटे नकाशे बनवून ही तक्रार केली आहे. आपण बिलांसोबत जोडलेले ‘जीपीएस’ रिपोर्ट अधिकृत आहेत.
बोगस खेपा दाखवून टँकरची बिले; अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 4:01 AM