.....
प्रभाग १३ मध्ये लसीकरण केंद्र सुरू करा
अहमदनगर: शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये नव्याने लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका सोनाली चितळे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाव्दारे गुरुवारी केली. शहरातील दिल्लीगेट, आनंदीबाजार, चितळे रोड आदी भागांसाठी एकच लसीकरण केंद्र आहे. त्यामुळे गर्दी होत असून, प्रभाग क्रमांक १३ मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी चितळे यांनी केली.
......
खरीप पिकांबाबत ऑनलाईन प्रशिक्षण
अहमदनगर: शेवगाव तालुक्यातील दहिगाव- ने येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने या भागातील शेतकरी व विस्तार सेवकांना खरीप हंगामाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणात कृषी विभाग केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, विशेष तज्ज्ञ सचिन बडधे, नारायण निंबे यांनी मार्गदर्शन केले.
....
पाणीपुरवठा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत
अहमदनगर: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळानगर पाणी उपसा केंद्रातील विद्युत पंप दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरासह उपनगरांना दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा झाला नाही.
.....
दक्षता पथकाकडून कारवाई
अहमदनगर: महापालिकेने कठोर निर्बंध लागू केलेले असताना शटर बंद करून दुकाने सुरू असून, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. दुकानदारांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
....