शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

सार्वजनिक ठिकाणी केलं बर्थडे सेलिब्रेशन, 35 जणांविरोधात दाखल झाला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:17 PM

अहमदनगर: गदीर्बाबत प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी असतानाही नगरमध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्ते नेहमीप्रमाणे बर्थडे सेलिब्रेशन करून सोशल डिस्टंसिंगला तिलांजली देत आहेत.

अहमदनगर: गदीर्बाबत प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी असतानाही नगरमध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्ते नेहमीप्रमाणे बर्थडे सेलिब्रेशन करून सोशल डिस्टंसिंगला तिलांजली देत आहेत.भाजपकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढलेले विनय वाखुरे यांनी 13 जून रोजी शहरातील प्रोफेसर चौक परिसरात गर्दीत आपला वाढदिवस साजरा केल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात विनय वाखुरे यांच्यासह अजय रासकर, संदीप चौधरी, महेश थोरात, मयुर कुलकर्णी व निखिल मोयल व इतर 30 ते 35 जणांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक अजय गव्हाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. वाखुरे यांनी मात्र कुठलीही परवानगी न घेता प्रोफेसर चौकातील अबेदिन पेंट्स येथे एकत्र जमून वाढदिवस साजरा करत शासकीय आदेशाचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मंगेश खरमाळे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असताना मास्क न घातल्याने त्यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.