अहमदनगर : महापौर पदाची निवडणूक २८ डिसेंबरला होत असून भाजपकडून तिस-यांदा नगरसेवक झालेले बाबासाहेब सोन्याबापू वाकळे महापौर पदासाठी मोर्चबांधणी करीत आहेत. मात्र त्यांनी तिसरे अपत्य लपवल्याने त्यांचे नगरसेवक पदच धोक्यात येण्याची शक्यता आहे.प्रभाग क्र. ६ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार अर्जुनराव बोरुडे यांनी यांच्या निवडीला जिल्हा न्यायालयात आक्षेप घेतला आहे. त्यावर आज दुपारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या १२ सप्टेंबर २००१ च्या आदेशानुसार तिसरे अपत्याला जन्म देणा-या पालकांना सरकारी नोकरी करता येत नाही अथवा कोणतीही निवडणुक लढवता येत नाही. परंतु बाबासाहेब वाकळे यांनी १० आॅक्टोबर २००१ रोजी तिसरे अपत्याला जन्म दिला आहे. वाकळे यांना श्रध्दा व प्राजक्ता ही पहिली दोन अपत्ये तर अजिंक्य हे तिसरे अपत्य आहे. श्रध्दा व प्राजक्ता यांचे मतदारयादीतही नाव आहे. परंतु अजिंक्य याचे नाव मतदारयादीत नाही. अजिंक्यचे नाव वाकळे यांनी लपवले आहे. रेशनकार्ड व हॉस्पिटलमधील पुराव्यानुसार सरला व बाबासाहेब वाकळे या दाम्पत्याला तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाकळे यांचे नगरसेवक रद्द करावे अशी मागणी बोरुडे यांनी न्यायालयात केली आहे.वाकळे यांचे गुडघ्याला बाशिंगमहापालिका निवडणुकीत भाजप तिस-या क्रमांकावर जाऊनही महापौर पदासाठी मोर्चबांधणी करत आहे. बाबासाहेब वाकळे यांनी महापौर होण्यासाठी जोरदार मोर्चबांधणी सुरु केली आहे. मात्र त्यांच्या नगरसेवक पदावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकूणच महापालिका निवडणुक भाजपासाठी अडचणीची ठरली आहे. सुरुवातीला खासदार पुत्र सुवेंद्र गांधी व सुन दिप्ती गांधी यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर बाबासाहेब वाकळे यांच्या रुपाने भाजपाला बसणारा हा तिसरा झटका आहे.
भाजपाचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी लपवले तिसरे अपत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:44 AM
महापौर पदाची निवडणूक २८ डिसेंबरला होत असून
ठळक मुद्देभाजपचे महापौर पदाचे उमेदवार अडचणीत