शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

कमांडर जानकरांना भाजपाने डिमांडरही ठेवले नाही; रासपचा विधानसभेला एकही उमेदवार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 12:26 PM

‘मी डिमांडर नव्हे तर कमांडर आहे’ असे म्हणणा-या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकही जागा सोडली नाही. अखेर दौंड आणि जिंतूर हे दोन मतदारसंघ तरी पक्षाला मिळतील अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणी येथील दोन्ही उमेदवारांना भाजपानेच एबी फॉर्म देत विधानसभेत ‘रासप’चा कप रिकामाच ठेवला.  

अरुण वाघमोडे ।  अहमदनगर : ‘मी डिमांडर नव्हे तर कमांडर आहे’ असे म्हणणा-या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकही जागा सोडली नाही. अखेर दौंड आणि जिंतूर हे दोन मतदारसंघ तरी पक्षाला मिळतील अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणी येथील दोन्ही उमेदवारांना भाजपानेच एबी फॉर्म देत विधानसभेत ‘रासप’चा कप रिकामाच ठेवला.  महादेव जानकर यांनी २००३ साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या पंधरा ते सोळा वर्षात महाराष्ट्रासह २७ राज्यात पक्षाची ओळख निर्माण केली.  महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या चार राज्यात रासपला पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. धनगर समाजासह बहुजनांच्या प्रश्नांवर आवाज उठविणा-या जानकरांची सर्वव्यापक ओळख निर्माण झाली.  जानकरांच्या पक्षाचा विस्तार पाहता २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने रासपला जवळ करत मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. वर्षभरापूर्वी जानकरांचे पक्षस्थापनेपासूनचे सहकारी असलेल्या बाळासाहेब दोडतले यांना शेळी-मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्षपद दिले. सत्तेत सहभागी झालेल्या जानकरांचा आवाज मात्र गेल्या पाच वर्षात क्षीण झालेला दिसला. विधानसभा निवडणुकीत जानकरांनी रासपला प्रथमच ५७ जागा देण्याची भाजपाकडे मागणी केली. त्यानंतर १४ अन् शेवटच्या क्षणी दोन जागांवर समाधान मानले होते.  भाजपाने मात्र या दोन जागाही जानकरांच्या पदरात टाकल्या नाहीत. पक्षाच्या वाट्याला एकही जागा न आल्याने उद्विग्न झालेल्या जानकरांनी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि पक्षाने जिंंतूर मतदारसंघातून घोषित केलेल्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.  ‘भाजपाने फसविले असले तरी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे’ असे सांगत जानकरांनी महायुतीतच राहण्याचे संकेत दिले आहेत.पक्षाची अवहेलना कार्यकर्त्यांच्या जिव्हारी रासपच्या महाराष्ट्रात शहरासह ग्रामीण भागातही शाखा स्थापन झालेल्या असून, कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षालाही महायुतीकडून एकही जागा न मिळाल्याने ही अवहेलना कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत पक्षाला हक्काच्या जागा मिळणे अपेक्षित होते.  मात्र एकही जागा मिळाली नाही. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्यानुसार आमची पुढील वाटचाल राहणार असल्याचे रासपचे अहमदनगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी सांगितले़. जिल्ह्यातही रासपचे पदाधिकारी निवडणुकीपासून दूर निवडणुकीत जागा न मिळाल्यानंतरही रासप पक्ष महायुतीत आहे़ पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मात्र सध्या निवडणुकीपासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावयाची याबाबत पक्षश्रेष्ठींकडून काही आदेश आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी आम्ही अजून निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे रासपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी यांनी सांगितले़ 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019