शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
3
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
4
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
5
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
6
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
7
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
8
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
9
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
10
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
11
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

सध्या सुडनाट्य अन् गुंडाराज सुरू; सुधीर मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 11:32 PM

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

राज्यात सध्या सुडनाट्य आणि गुंडाराज सुरू आहे. संविधानाचा सन्मान टिकवण्याऐवजी संविधान आणि लोकशाहीला गालबोट लागेल अशी कृती होत आहे. मात्र, जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या शक्तीच्या आधारावर सर्व भोगावं लागत आहे, अशी टीका भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

वंदे मातरम, भारत माता तसेच पंतप्रधानांसंदर्भात अपशब्द वापरणे हा राजद्रोह नाही. मात्र,  हनुमान चालिसाचे पठण करणे हा राजद्रोह ठरत आहे. परिवारात पात्रता नसताना मोठ्या पदावर ‌जाता येतं.ज्यांना वाईट कृती करायची त्यांनी करावी. न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास असून अपिलात राणा दाम्पत्याचा विजय नक्की होईल, असं सुधीर मुंनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे की, कधीही बँक डोअर एंट्री करू नका. नरेंद्र मोदी देखील राज्यसभेतून येऊ शकले असते. मात्र, ते जनतेतून निवडून आले. बँक डोअर एंट्री करणाऱ्यांना फक्त षडयंत्री राजकारण समजतं, असं मुनगंटीवार म्हणाले. 

जनतेतून निवडून न आल्याने जनतेच्या‌ समस्या आणि त्यांचे प्रश्न काय ? लोकहीत काय यापेक्षा फक्त स्वार्थाचा बाजार कसा करायचा हे त्यांना समजतं. भारतीय जनता पार्टी राष्ट्रपती राजवट लावेल असं त्यांना वाटत असेल. मात्रं भाजप दुसऱ्या मार्गाने राष्ट्रपती राजवट लावणार नाही, असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. 

दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही- केंद्रीय मंत्री नारायण राणे

पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहिती नाही. ८९ हजार कोटींचा तूट आहे. राज्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली आहे. 

राष्ट्रपती राजवट लावल्यास राज्यातील जनता पेटून उठेल- मंत्री जयंत पाटील

राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.  विरोधकांचे आता सर्व उपाय संपले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न दिसत आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार