जामखेड : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुका ओबीसी आरक्षणशिवाय होत आहेत. ही ओबीसी समाजावर सरकारने वेळ आणली आहे. या घटनेचा जामखेड भाजप ओबीसी सेलने सरकारचा निषेध करून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी ओबीसी तालुका प्रमुख गौतम कोल्हे, पं. स. सदस्य डाॅ. भगवान मुरुमकर, प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस सलीम बागवान, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, प्रवीण चोरडिया, दत्ता राऊत, युवा मोर्चाचे शरद कार्ले, उपाध्यक्ष मोहन गडदे, अशोक महानवर, शहराध्यक्ष अभिराजे राळेभात, सुधीर राळेभात, काशिनाथ ओमासे, प्रवीण सानप, सरचिटणीस अर्जुन म्हेत्रे, अण्णासाहेब ढवळे, भानुदास टिळेकर, महेश मासाळ, गणेश लटके, शिवकुमार डोंगरे, उमेश रोडे उपस्थित होते.
जामखेड येथे भाजपने नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:25 AM