शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:21 AM

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

अकोले : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या मागे जनता आहे, पण त्यांचे नेते हतबल झाले आहेत. आपण भाजपपासून दूर गेल्यानंतर ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या अगदी गळ्यात गळे घातले नाहीत पण राजकियदृष्ट्या त्यांच्या अधिक जवळ गेलोय! हे अगदिच असत्य नाही असे स्पष्ट करत ‘सनातन’वर बंदी घालावी, अशीही मागणी खासदार शेट्टी यांनी केली.नाशिक-पुणे प्रवासाच्या दरम्यान खासदार शेट्टी यांनी इंदोरी-रुंभोडी या गावांना भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष साथी दशरथ सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संवाद साधला.‘मोदी’ हे चांगले अभिनेते आहेत. त्यांनी ‘अच्छे दिन’ या गोंडस शब्दांना आर्थिक व सामाजिक प्रश्नांची जोड देवून सत्ता मिळवली. मोदी करतील असे अभास निर्माण झाला होता. आता ही जादू विरली आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा देखील तरुणाईचा उन्माद दिसला पण तो फार काळ टिकून राहीलेला नाही.त् ासेच ‘भाजप’च्या तालीबानी विचारांचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही. लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही. विचाराच्या पातळीवर भाजप लढाई करत नाही. शारीरिक हल्ल्यांपर्यंत त्यांची मजल गेली आहे. महात्मा गांधींना खलनायक ठरवण्याचा भाजपाचा घाट जनता कधीच यशस्वी होऊ देणार नाही. महात्मा गांधीचे विचारच देशाला तारणहार ठरत आहेत. पुरोगामीत्व टिकवण्याची जबाबदारी कॉग्रेस - राष्ट्रवादीची असून आता त्यांना प्रतिगाम्यांशी लढण्यासाठी आमच्या सारख्या पुरोगामी संघटनांच्या मदती शिवाय पर्याय नाही. शहरांना सूज येत असून खेडी ओस पडत चालली आहे. कष्टकरी श्रमीकांच्या उध्दारासाठी सघंटना बळकट व्हायला हवी. विवेकशून्य लोक तरुणाईची माथी भडकवण्याच काम करतायेत,हे थांबवायला हवं. चळवळीची दिशा भरकटू नये, म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी सजग रहायला हवं, असे मत खासदार शेट्टी यांनी व्यक्त केलं.चळवळी भरकटू नयेतनगर जिल्ह्याने राज्याच्या शेतकरी कामगार चळवळीला विचार व नेतृत्व दिलं. साखर सम्राटांच्या उदयामुळे ते लुप्त झालं होतं. सहकारातून वैचारीक गुलामगिरी वाढली होती. आता पुन्हा एकदा ‘दूध व ऊस’ आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चळवळ बाळसं धरु लागली आहे. चळवळी भरकटू नये म्हणून त्या योग्य माणसांच्या हातात जायला हव्यात, त्यासाठी सप्टेंबर मधे कृती कार्यक्रम घेवू असे खासदार शेट्टी यांनी सावंत यांचे घरी कार्यकर्त्यां मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी सावकार मादनाईक, हंसराज वडगुले, नाना बच्छाव, सागर पिंपरगे, भाऊसाहेब चासकर, भानुदास हासे, बबन नवले, परबत नाईवाडी, रमेश जगताप, पोपट सावंत, प्रकाश मालुंजकर, सुभाष येवले, चंद्रकांत नेहे, डॉ.रविंद्र सावंत उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले