श्रीगोंदा : बाप - लेकांनी नगराध्यक्षा पदाची सुनीता शिंदे यांना उमेदवारी सहा महिन्यापुर्वी निश्चित केली होती. मला ही कुणकुण लागल्याने भाजपाला रामराम केल्याचा गौप्यस्फोट नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.पोटे म्हणाले, मी भाजपा सोडल्यानंतर त्यांनी दुस-या उमेदवार का दिला नाही. मी नगरसेवक पदाची निवडणुक लढविणार नव्हतो. परंतु श्रीगोंदा कारखान्यात उपाध्यक्ष असताना टक्केवारी खाणा-यांची काटा करण्यासाठी मैदानात उतरावे लागले आहे. श्रीगोंदा शहरातील नागरिकांना पाचपुते बंधूंनी मनमोकळे पणे कधीच राजकारण अथवा विकास करू दिला नाही. आता ख-या अर्थाने श्रीगोंदा शहराला स्वातंत्र्य मिळणार आहे. पाचपुते दादा विकासावर बोलले असते. आम्ही सुध्दा तोंड उघडले नसते. पण त्यांना माझ्या गाडीला पनवेल कनेक्शन जोडले. खुप वाईट वाटले पण कोणाचे कुठे कनेक्शन आहे. हे सर्वांना न्यात आहे, असेही पोटे म्हणाले.लेंडी नाला प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमीन नकाशावर खाडाखोड केल्याचे पाचपुते टीमने सिध्द केले तर निवडणुकीतून माघार घेऊ. डी वाय १० चारीचा दहा वेळा नारळ फोडून श्रीगोंद्यातील शेतक-यांना कोणी फसविले, असा जाहीर प्रतिसवाल पोटे यांनी केला.पाचपुतेंचा बालिशपणालेंडी नाला तलाव नगरपालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी माझ्याकडे जबाबदारी सोपवली. आपण आठ दिवसात हे जिल्हा परिषदमध्ये नेले होते. पण पाचपुतेंनी केलेला आरोप हा बालिशपणा आहे, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी मारला.एकाच वेळी दोघांचा बंदोबस्तदरेकर व नाहाटा यांनी दुस-यांवर आरोप करून सत्तेसाठी नेहमीच माकड उड्या मारण्याचे काम केले आहे. आता एकाच वेळी दोघांचा बंदोबस्त होणार आहे, असा विश्वास नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केला.
शिंदे यांना उमेदवारी देण्याची कुणकुण लागल्याने भाजपाला रामराम : मनोहर पोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 7:13 PM